logo

होळी लहान करा व पोळी दान करा ,याविषयी प्रबोधन पर व्याख्यानाचे आयोजन

मुंबई - महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती शाखा रबाळे यांच्या वतीने आज नवी मुंबई महानगरपालिका संचलित राजश्री छत्रपती शाहू महाराज विद्यालय शाळा क्रमांक 55 राबाडा येथे 'होळी लहान करा व पोळी दान करा' याविषयी प्रबोधन पर व्याख्यान आयोजन करण्यात आलं होतं याप्रसंगी रबाळे शाखेचे कार्याध्यक्ष अविनाश जाधव यांनी स्वागत व प्रास्ताविक करून कार्यक्रमाची सुरुवात केली यानंतर प्रमुख मनोगतामध्ये शाखेचे प्रधान सचिव व मुख्याध्यापक अमोल खरसंबले यांनी सर्व मुलांना होळीसाठी लाकडं तोडून न आणता आपल्या अवतीभवती पडलेला केर कचरा एकत्र जमा करून त्याची होळी करा व होळीमध्ये पोळी न टाकता त्या पोळ्यांचे एकत्रीकरण करून ज्या आपल्या बांधवांना पोळी खायला मिळत नाही त्यांना ती पोळी द्या असं संदेश आपल्या मनोगतांमधून दिला त्याचबरोबर आपले दुर्गुण या होळीच्या अग्नीमध्ये जाळून टाका आणि सर्वांशी प्रेमाने वागा असा संदेश यावेळी त्यांनी दिला नवी मुंबई जिल्हा प्रधान सचिव प्रा अमोलकुमार वाघमारे यांनी कार्यक्रमाचे आभार मानले व विद्यार्थ्यांना पर्यावरण पूरक रंगपंचमी साजरी करा नैसर्गिक रंगांचा वापर करा असा संदेश दिला यावेळी शाळेतील 45 विद्यार्थी व शिक्षक गजानन वाख, संतोष वाजे, प्रदीप परदेशी उपस्थित होते.

4
1548 views